ग्रामपंचायत हसलगण (सं)
सुसज्ज इमारत • पारदर्शक प्रशासन • लोकाभिमुख उपक्रम
हसलगण (सं) ग्रामपंचायतने अनेक योजनांद्वारे गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे — सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
लोकसंख्या (2011)
4,313
कुटुंब संख्या
714
वाटप घरकुल
75
🏠
ग्रामविकास व नागरी सुविधा
प्रधानमंत्री आवास योजना, कचर्याचे व्यवस्थापन, सौरऊर्जा व व्यायामशाळा इत्यादी सुविधांचे यशस्वी राबवण.
🏠 ग्रामविकास व नागरी सुविधा
- प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी योजना अंतर्गत ७५ घरकुल वाटप
- ग्रामनिधीच्या ५% निधीतून अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यास सहकार्य
- प्रत्येक घराला ओला व सुका कचरा कुंडी वाटप
- प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी
- करवसुलीत QR कोड प्रणालीचा वापर
- सौर ऊर्जा सर्व शासकीय कार्यालयात व खुली व्यायामशाळा उपलब्ध
- तक्रार पेटी व तक्रारी निराकरण व्यवस्थापन
🌱 शिक्षण व बालविकास
- अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आल्या
- रेन वॉटर हार्वेस्टिंग शाळा व अंगणवाड्यांमध्ये बसवली
- स्मार्ट क्लासरूम, स्वच्छ शौचालये व पिण्याचे पाणी उपलब्ध
- गुरुपौर्णिमेवर शिक्षकांचा गौरव व विद्यार्थ्यांचा सन्मान
- स्पर्धा परीक्षा तयारीसाठी युवकांना साहित्य वाटप
💪 आरोग्य व स्वच्छता
- दर महिन्याला श्रमदानातून सार्वजनिक स्वच्छता
- महा आरोग्य शिबिरांतर्गत तपासण्या (HB, BP, दृष्टी इ.)
- वृद्धांना विरंगुळा केंद्र (बैठक, पाणी, वीज, वृत्तपत्र)
- दिव्यांग नागरिकांना सहाय्य व ओळखपत्र वितरण
- प्राणी आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीम
- कोविड-१९ काळात ग्रामपंचायतीचे सक्रिय कार्य
🌾 शेती व रोजगार
- MREGS अंतर्गत शेत व गावातील रस्त्यांचे मजबुतीकरण
- ४० शेतकऱ्यांना गोठे, ९ शेतकऱ्यांना सिचंन विहिर मंजूर
- फळबाग लागवड प्रकल्प व महिला बचत गटांना प्रशिक्षण
- महिला स्वावलंबन व उद्यमिता कार्यक्रम
💻 डिजिटल ग्रामपंचायत
📲 My Panchayat & डिजिटल सेवा ▼
आपले सरकार सेवा केंद्र — सर्व ऑनलाईन सेवा एका ठिकाणी. My Panchayat App, ग्रामसंवाद App व पंचायत निर्णय App चा नागरिकांकडून वापर. दाखले, परवाने व तक्रारी संगणकीकृत पद्धतीने उपलब्ध.
🌳 पर्यावरण आणि शाश्वतता ▼
- रेन वॉटर हार्वेस्टिंग व सौरऊर्जा प्रकल्प
- घनकचरा व्यवस्थापन व वृक्षारोपण
- स्मशानभूमीत हरित उपक्रम आणि बसण्याची सोय
👏 सामाजिक सुरक्षा व कल्याण ▼
- इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांमध्ये 100% लाभार्थी समावेश
- आयुष्मान भारत कार्ड वितरण व गरजूंना घरकुल उपलब्ध करणे
आपल्या सूचना किंवा योजना प्रस्तावित करण्यासाठी आम्हाला लिहा — आम्ही वेळेवर प्रत्युत्तर देऊ.